PM Kisan Scheme Inilegible Farmer 2025 केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेत काही महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. या योजनेचा लाभ घेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. काही शेतकरी आता या योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत, तर काहींचे हप्ते अद्यापही पेंडिंग आहेत. हप्ते का मिळाले नाहीत, ते कधी येणार आहेत, आणि अर्जांची स्थिती कशी तपासायची याची संपूर्ण माहिती या लेखातून सविस्तर समजून घेऊ.
पीएम किसान योजना ही केंद्र शासनाने सुरू केलेली एक शेतकरी लाभदायक योजना आहे. या योजनेचा उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना आर्थिक मदत पुरवणे. या योजनेद्वारे, प्रत्येक पात्र शेतकऱ्याला दरवर्षी ₹6000 रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात डीबीटी (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) प्रणालीद्वारे दिली जाते. ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये विभागली जाते: प्रत्येकी ₹2000 हप्ता.
गेल्या वर्षभरात या योजनेतून लाखो शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे. 18वा हप्ता 5 ऑक्टोबर 2024 रोजी जमा करण्यात आला होता. पुढील हप्ता जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीस येण्याची शक्यता आहे.
काय बदल झाले आहेत? कोणते शेतकरी ठरणार अपात्र?
पीएम किसान योजनेत काही विशिष्ट प्रकारचे शेतकरी आता अपात्र ठरणार आहेत. खाली या शेतकऱ्यांच्या श्रेणी दिल्या आहेत:
-
संस्थात्मक जमीनधारक शेतकरी
अशा शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. -
केंद्र आणि राज्य सरकारचे अधिकारी आणि कर्मचारी
- राज्य व केंद्र सरकारच्या मंत्रालये, कार्यालये आणि विभागांमध्ये कार्यरत असलेले अधिकारी.
- निवृत्त अधिकारी आणि कर्मचारी, ज्यांची मासिक पेन्शन ₹10,000 किंवा त्यापेक्षा जास्त आहे.
- “ड” वर्गातील सरकारी कर्मचारी वगळता इतर सर्व कर्मचारी अपात्र ठरणार आहेत.
-
आयकर भरणारे शेतकरी
मागील मूल्यांकन वर्षात ज्यांनी आयकर भरला आहे, ते शेतकरी आणि त्यांचे कुटुंबही योजनेतून वगळले जातील. -
व्यावसायिक व्यक्ती आणि इतर विशेष श्रेणी
- डॉक्टर, अभियंते, वकील, चार्टर्ड अकाउंटंट, आणि वस्तुविशारद यांसारखे व्यावसायिक.
- माजी आणि विद्यमान लोकप्रतिनिधी, मंत्री, राज्यमंत्री, महापौर, तसेच जिल्हा परिषद सदस्य यांनाही योजनेचा लाभ मिळणार नाही.
हप्ते पेंडिंग का आहेत?
जर तुमच्या खात्यावर आतापर्यंत हप्ता आला नसेल किंवा काही हप्ते मिळाल्यानंतर थांबले असतील, तर यामागे काही सामान्य कारणे असू शकतात:
- ई-केवायसी पूर्ण नसणे: शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया वेळेत पूर्ण केली नसेल.
- आधार लिंक न केलेले खाते: आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसल्यास रक्कम जमा होऊ शकत नाही.
- डॉक्युमेंट पडताळणी प्रलंबित: अर्जांसाठी आवश्यक कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाली नसल्यामुळे हप्ते पेंडिंग राहू शकतात.
- तांत्रिक अडचणी: अर्ज प्रक्रिया किंवा बँक खात्यांमधील तांत्रिक समस्या देखील कारणीभूत असतात.
हप्ते कधी येणार आणि त्यासाठी काय करावे?
जर तुमचे हप्ते अद्याप आले नसतील, तर तुम्ही पीएम किसान डॉट जीओव्ही डॉट इन (PMKisan.gov.in) या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन हप्त्याची स्थिती तपासू शकता. खालील पद्धतीने तुम्ही स्थिती तपासू शकता:
-
गुगलवर पीएम किसान वेबसाइट शोधा:
संकेतस्थळावर जाण्यासाठी PMKisan.gov.in टाका किंवा थेट लिंकवर क्लिक करा. -
हप्त्याची स्थिती तपासा:
- संकेतस्थळावर “बेनिफिशियरी स्टेटस” या पर्यायावर क्लिक करा.
- तुमचा आधार नंबर, मोबाईल नंबर किंवा बँक अकाउंट नंबर टाका.
- सबमिट केल्यानंतर तुमच्या हप्त्याची सध्याची स्थिती दिसेल.
-
पेंडिंग अर्जांसाठी नोडल ऑफिसरशी संपर्क साधा:
- संकेतस्थळावर स्क्रोल करून “कॉन्टॅक्ट पीओसी” हा पर्याय निवडा.
- तुमच्या राज्य आणि जिल्ह्यानुसार नोडल ऑफिसरचा संपर्क क्रमांक निवडा.
- अधिक माहितीसाठी त्यांच्याशी संपर्क साधा.